… मात्र सरकारसाठी ‘सब चंगा सी’, राहुल गांधींची जोरदार टीका


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरस महामारीला रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, अर्थव्यवस्थेची घसरण आणि रोजगाराच्या मुद्यावरून केंद्रावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या ‘सुनियोजित’ लढाईने भारताला रसातळाला पोहचवले असल्याचे, ते म्हणाले.

मोदी सरकार आणि माध्यमांवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, कोव्हिड विरुद्धच्या सरकारच्या व्हायरसविरुद्धच्या ‘सुनियोजित’ लढाईने भारताला रसातळाला पोहचवले आहे. जीडीपीत ऐतिहासिक 24 टक्के घसरण, 12 कोटी नोकऱ्या गेल्या, 15.5 कोटी रुपयांचे अडकलेले कर्ज, जगभरात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यू… मात्र तरीही भारत सरकार आणि मीडियासाठी सब चंगा सी.

दरम्यान, राहुल गांधी अर्थव्यवस्था आणि सीमेवरील चीनच्या घुसखोरीवरून वारंवार सरकारवर टीका करत आहे. सरकारने चीनची घुसखोरी रोखण्यासाठी काय पावले उचलली ? असा सवाल देखील राहुल गांधींनी विचारला होता.