मोहम्मद पैंगबरांचे व्यंगचित्र छापल्याने अल-कायदाने पुन्हा दिली शार्ली हेब्डोला हल्ल्याची धमकी

अल-कायदाने फ्रान्सचे व्यंग साप्ताहिक शार्ली हेब्डोला पुन्हा एकदा 2015 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. दोन आठवड्यांपुर्वीच या हल्ल्याची सुनावणी सुरू झाली आहे. या निमित्ताने साप्ताहिकाने पुन्हा एकदा मोहम्मद पैंगबर यांचे व्यंगचित्र छापले होते. या व्यंगचित्रामुळेच 2015 साली कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, अल-कायदाने आपले प्रकाशन वन उम्माहमध्ये धमकी दिली आहे की, जर शार्ली हेब्डोला वाटत असेल 2015 चा हल्ला एकमेव असेल, तर ही त्यांची मोठी चूक आहे. अल-कायदा अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्याला 19 वर्ष पुर्ण झाल्याने हे एडिशन छापले होते. दहशतवादी संघटनेने धमकी दिली की, फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनल मॅक्रोनला तोच संदेश देईल, जो फ्रांकोइस ओलांदेला दिला होता. मॅक्रोन यांना हे व्यंगचित्र पुन्हा छापण्याची परवानगी दिल्याच अल-कायदाने म्हटले आहे.

तर दुसरीकडे साप्ताहिकाचे संचालक लॉरेंट सुरुसू न्यायालयात म्हणाले की, व्यंगचित्र पुन्हा छापण्याचा कोणताही पश्चाताप नाही. लॉरेन्ट स्वतः त्या हल्ल्यात जखमी झाले होते.