सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड २ चे प्रीबुकिंग सुरु होणार

कोरिअन जायंट इलेक्ट्रोनिक्स कंपनी सॅमसंगने त्यांच्या नव्या गॅलेक्सी झेड फोल्ड २ स्मार्टफोनसाठी प्री बुकिंग सुरु झाल्याची घोषणा केली असून येत्या १४ सप्टेंबर पासून ग्राहक कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व रिटेल स्टोर्स मध्ये बुकिंग करू शकतील. या फोन सोबत अनेक आकर्षक ऑफर्स कंपनीने देऊ केल्या असून या फोनची किंमत आहे १,४९,९९० रुपये. कंपनीचा हा तिसरा फोल्डेबल स्मार्टफोन आहे.

सॅमसंगने याच महिन्यात नवा फोन पेश केला असून त्यात अनेक नवीन फिचर्स दिली गेली आहेत. हा फोन मिस्टीक ब्लॅक आणि मिस्टीक ब्राँझ अशा दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला गेला आहे. ग्राहकांना नो कॉस्ट इएम, चार महिने फ्री युट्यूब प्रीमियम, मायक्रोऑफिस ३६५ वर २२ टक्के डिस्काऊंट अश्या ऑफर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड दोन मध्ये दोन डिस्प्ले असून फोल्ड स्थितीत ६.२ इंची इन्फिनिटी कव्हर स्क्रीन, ईमेल चेक, स्मार्टफोन अनफोल्ड न करता महत्वाचे कॉन्टॅक्ट पाहता येणे शक्य आहे. अनफोल्ड केल्यावर या फोनला ७.६ इंची फुल एचडी डिस्प्ले मिळतो. बाहेरच्या डिस्प्लेवर फ्रंट कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच असून स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर, १२ जीबी रॅम, २६५ इंटरनल स्टोरेज, १२+१२+१२ एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रो व्हिडीओ, सिंगल टेक, ब्राईट नाईट, नाईट मोड सह दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी १० एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनसाठी सुपरफास्ट चार्जिंगची ४५०० एमएएच बॅटरी आहे.