टायगर ३ साठी सलमानचे १ अब्ज मानधन

बॉलीवूड दबंग हिरो सलमान खानच्या गाजलेल्या टायगर चित्रपट सिरीज मधला टायगर तीन चे शुटींग सुरु झाले आहे. सलमानने या चित्रपटासाठी १०० कोटी म्हणजे १ अब्ज रुपये मानधन घेतले असून त्यामुळे बॉलीवूड मध्ये मानधनाचा नवा विक्रम नोंदविला जात असल्याचे समजते. या शिवाय सलमान चित्रपटाला जो नफा मिळेल त्यातील हिस्सा सुद्धा घेणार आहे.

यशराज फिल्मच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे. बॉलीवूडच्या इतिहासात या चित्रपटाचे बजेट सर्वाधिक असून चित्रपटासाठी दोनशे ते सवादोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. टायगर् तीन मध्ये सलमानच्या जोडीला कतरिना कैफ असेल. चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी २० ते २५ कोटींचे बजेट निश्चित केले गेले असल्याचेही सांगितले जात आहे.

टायगर तीनचे शुटींग ६ ते ७ देशात एका आंतरराष्ट्रीय स्टंट टीम सह केले जाणार आहे. जगभरात हे शुटींग होईल. गेली दोन वर्षे या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु होते. २०१७ साली आलेल्या टायगर जिंदा है या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींची तर भारतात ३३९.१६ कोटींची कमाई केली होती.