अमेरिकेत जन्माला आली गोरीपान म्हैस

जगात कुठेही गेले तरी म्हैस या प्राण्याचा रंग काळाच दिसतो. आपल्याकडे तर काळ्या वर्णाचे वर्णन म्हशीसारखा काळ ढूस्स असेच केले जाते. विशेष म्हणजे वर्णद्वेषवरून सतत चर्चेत असलेल्या अमेरिकेत सुद्धा म्हैस काळीच असते. पण अमेरिकेत नुकताच एक चमत्कार घडला असून येथे काळ्या म्हशीने गोऱ्यापान रेडकाला  जन्म दिला आहे. अमेरिकेच्या मोंटाना भागात ही दुर्मिळ घटना घडली असून या नव्या रेडकाचे नामकरण व्हाईट बफेलो मेडेन असे केले गेले आहे.

ज्या आदिवासी भागात हे गोरे पिलू जन्माला आले आहे तेथील लोक हा निसर्गाचा चमत्कार मानत आहेत तर वैज्ञानिक याला अद्भूत घटना म्हणत आहेत. प्राणी संशोधकांच्या मते १० लाखात म्हशीला असे एखादे गोरे पिलू होऊ शकते. पण हे पिलू मोठे होईल तसा त्याचा पांढरा रंग कमी होत जाईल आणि तेही काळे किंवा भुऱ्या रंगाचे होईल.

स्थानिक लोकांना या रेडकाचा जन्म हे चांगल्या भविष्याचा संकेत वाटतो आहे. त्यांनी या वासराच्या जन्मानिमित्त उत्सव साजरा केला आहे. वैज्ञानिकांच्या मते हार्मोन बदलामुळे असे वासरू जन्माला येते.