चीनने आपली जमीन घेणे, हे देखील ‘Act of God’ का ?, राहुल गांधींचा सरकारवर हल्ला


भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. चीनने आपली जमीन ताब्यात घेतल्यानंतर ती परत मिळविण्यासाठी सरकारने काय केले ?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण कोरोनाच्या आपत्तीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ (देवाची करणी) असल्याचे म्हटले होते. याचाच उल्लेख करत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी सीमेवरी तणावाच्या मुद्यावरून ट्विट केले की, चीन आपल्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. ती जमीन परत मिळवण्यासाठी सरकार काय योजना बनवत आहे ? का हा मुद्दा देखील अ‍ॅक्ट ऑफ गॉड असल्याचे म्हणत सोडून देणार आहे ?

दरम्यान, राहुल गांधी कोरोनाग्रस्तांची देशातील वाढलेली लोकसंख्या आणि बेरोजगारीवरून सातत्याने सरकारवर टीका करत आहे. नोटबंदी, दोषपुर्ण जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यस्था उध्वस्त झाल्याची टीका त्यांनी केली होती.