संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या कंगनाच्या ‘फॅन’ला मुंबई पोलिसांकडून अटक


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेले आहे. कोलकत्तामधून या आरोपीला अटक करण्यात आले आहे. पलाष घोष असे नाव असणारा हा व्यक्ती कथितरित्या कंगना राणावतचा फॅन असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष टीमने कोलकत्ता पोलिसांच्या मदतीने धमकी देण्याच्या आरोपाखाली अटक केले आहे.

घोषने संजय राऊत यांना फोनकरून ‘गंभीर परिणाम भोगावे’ लागतील अशी धमकी दिली. यानंतर मुंबई पोलिसांनी कोलकत्ता पोलिसांशी संपर्क करत त्याला अटक केले. आरोपीला आज मुंबईला आणण्यासाठी न्यायालयात ट्रांजिट रिमांडची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर संजय राऊत यांनी कंगनाचा हरामखोर असा उल्लेख केला होता. यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले.