स्मार्टफोनपासून ते ऑनलाईन व्यवहारापर्यंत सर्व गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा महत्त्वाचा असतो. अनेकदा युजर कोणताही पासवर्ड ठेवतात, ज्यामुळे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सहज हॅक होते व खाजगी माहिती चोरली जाते. त्यामुळे पासवर्ड ठेवताना विशेष काळजी घ्यावी व सुरक्षित पासवर्ड ठेवावा.
हॅकिंगपासून वाचण्यासाठी पासवर्ड ठेवताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान
सुरक्षित पासवर्ड ठेवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया –
- तुमच्या सर्व प्लॅटफॉर्म्सला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी वेगवेगळे पासवर्ड वापरा. अनेकदा विसरू नये म्हणून आपण सर्व सोशल मीडिया अकाउंट, नेट बँकिंगेच पासवर्ड एकच ठेवतो. मात्र यामुळे नुकसान होते.
- नवीन अकाउंट उघडताना पासवर्ड देखील नवीन वापरा. जुन्या पासवर्डचा वापर करू नका. कारण हॅकर्स डार्क नेटवरून तुमचा जुना पासवर्ड सहज मिळवू शकतात.
- नवीन पासवर्ड सेट केल्यानंतर लक्षात राहावा म्हणून ईमेल, टेक्स डॉक्यूमेंट किंवा ऑनलाईन कोठेही ड्राफ्टमध्ये नमूद करून ठेवू नका. पासवर्डला वारंवार बदला.
- पासवर्ड लक्षात ठेवण्याची चिंता नको म्हणून कोणत्याही ब्राउजरला सेव्ह करण्याची परवानगी देऊ नका. जर तुम्ही कोणत्याही असुरक्षित वेबसाईटवर गेला किंवा तुमच्या सिस्टममध्ये मॅलवेअर असल्यास तुमचे अकाउंट हॅक होऊ शकते.
- Two-factor authentication चा वापर करा. याचा वापर केल्याने हॅकर्स तुमचा फोन अथवा अन्य कोणतेही प्लॅटफॉर्म हॅक करू शकणार नाही.
- फोन नंबरचा वापर पासवर्ड म्हणून करणे टाळा. ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. याशिवाय तुमचे नाव, जन्मतारीख देखील पासवर्ड म्हणून वापरू नका. यामुळे हॅकर्स तुमचे अकाउंट सहज हॅक करू शकतात.