Video : मुलगा होणार की मुलगी सांगण्यासाठी युट्यूबरने चक्क जगातील सर्वात उंच इमारतच केली बुक


सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. दुबईत एक जोडप्याने जेंडर रिव्हिल इव्हेंट अर्थात मुलगा होणार की मुलगी हे सांगण्यासाठी जे केले, त्याने सर्वचजण हैराण झाले आहेत. यूएईत राहणाऱ्या अनस आणि असला मारवाह यांनी जेंडर रिव्हिल इव्हेंटसाठी चक्क जगातील सर्वात उंच इमारतच बुक केली.  या जोडप्याने दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर हा इव्हेंट करण्याचे ठरवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जेंडर रिव्हिल पार्टी ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक वर्षांपासून जेंडर रिव्हिल पार्टीचे आयोजन केले जात आहे. यात जोडपे आपल्या मित्र आणि नातेवाईकांना बोलवतात. मात्र काहीज या अशा इव्हेंटचा विरोधत देखील करतात.

अनस आणि असला मारवाह यांच ‘द अनस’ला फॅमिली या युट्यूब चॅनेलला 7 मिलियन पेक्षा अधिक स्बस्क्राईबर्स आहेत. या पार्टीमध्ये जेंडर रिव्हिल करताना संपुर्ण इमारत रोषणाईने भरून गेली होती व अखेर “इट्स ए बॉय असे लिहून आल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसतो. बुर्ज खलिफावर अशा कार्यक्रमासाठी 1 लाख डॉलर्स (जवळपास 73 लाख रुपये) शुल्क घेतले जाते.

इंस्टाग्रामवर या व्हिडीओ आतापर्यंत 18 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. दरम्यान, या इव्हेंटसाठी या जोडप्याने शुल्क भरले होते की हा एक प्रमोशनल करार होता याची माहिती मिळालेली नाही.