…म्हणून मी दररोज गोमूत्र पितो, अक्षय कुमारने स्वतः केला खुलासा


अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘इन टू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ या शो मुळे चर्चेत आहे. या शोचा अनेक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा शो 14 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना डिस्कव्हरी चॅनेलवर पाहण्यास मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षय आणि आपल्या या विशेष एपिसोडबाबत टिव्ही होस्ट बेअर ग्रिल्ससोबत इंस्टाग्रामवर एक लाईव्ह सेशल केले. इंस्टाग्राम लाईव्हमध्ये अक्षयने आपण दररोज आयुर्वेदिक कारणांमुळे गोमुत्र प्राशन करतो असा खुलासा केला आहे.

लाईव्ह सेशन दरम्यान अभिनेत्री हुमा कुरैशीने अक्षयला हत्तीच्या विष्ठेपासून बनलेला चहा पिण्यास कसा तयार झालास ? असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना अक्षय म्हणाला की, मी काळजीत नव्हतो. मी उलट खूप उत्साहित होतो. मी आयुर्वेदिक कारणामुळे दररोज गोमुत्र प्राशन करतो. त्यामुळे माझ्यासाठी असे करणे काही अवघड नव्हते.

बेअर ग्रिल्स म्हणाला की, जेव्हा लोक प्रसिद्ध होतात, त्यावेळी आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर येणे बंद करतात. कारण त्यांना कमकुवत दिसण्याची भिती असते. मात्र अक्षय कुमार कोणत्याही गोष्टीसाठी तयार असतो.

दरम्यान, अक्षय कुमार आणि बेअर ग्रिल्सच्या या एपिसोडचे शूटिंग कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये केले आहे. 11 सप्टेंबरला डिस्कव्हरी+ आणि 14 सप्टेंबरला डिस्कव्हरीवर हा एपिसोड पाहता येईल.