7,000mAh ची पॉवरफूल बॅटरी असणारा ‘सॅमसंग गॅलेक्सी एम51’ भारतात लाँच


सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम51 अखेर आज भारतात लाँच केला आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात तब्बल 7000 एमएएच ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आलेली आहे. 7000 एमएएच बॅटरी देण्यात आलेला हा भारतातील पहिला फोन असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे. फोनची सुरुवाती किंमत 24,999 रुपये असून, हा फोन निळ्या आणि काळ्या दोन रंगात उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंच फूल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेली आहे. कंपनीने फोनमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले वापरला आहे. ग्राफिक्ससाठी यात Adreno 618GPU देण्यात आला असून, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर देण्यात आलेला आहे.

Image Credited – Tek Deeps

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. याचा प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. या व्यतिरिक्त 12+5+5 मेगापिक्सल असे तीन कॅमेरे मिळतील. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोनमधील 7000 एमएएच बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, 24 तास युजर्स यावर इंटरनेट वापरू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

Image Credited – deccanherald

गॅलेक्सी एम51 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 512 जीबीपर्यंत वाढवता येते. अ‍ॅमेझॉन आणि सॅमसंगच्या वेबसाईटवरून 18 सप्टेंबरपासून हा फोन खरेदी करता येईल. एचडीएफसीचे कार्ड वापरून खरेदी केल्यास 2000 रुपये सूट देखील मिळेल.