पंतप्रधानांनी लाँच केले E-GOPALA अ‍ॅप, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा


केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी वारंवार पावले उचलत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपचे नाव ई-गोपाला असून, या अ‍ॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना प्राण्यांद्वारे उत्पन्न वाढवण्यास मदत मिळेल.

ई-गोपाला अ‍ॅपबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल प्रदान करते. हा एक नाविन्यपुर्ण प्रयत्न असून, याद्वारे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. हे अ‍ॅप डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि प्राण्यांचे उत्पादकता वाढवण्याचे ऑनलाईन माध्यम आहे.

या अ‍ॅपद्वारे प्राण्यांचे कृत्रिम गर्भाधान, प्राण्यांचे प्रथमोपचार, लसीकरण, आणि प्राण्यांचे पोषण इत्यादी गोष्टींसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. त्याचबरोबर, या अॅपद्वारे लसीकरण, गर्भधारणेचे निदान, प्राण्यांना शांत करणे इत्यादींसाठी नियोजित तारखेची, तसेच त्या परिसरातील सरकारी योजना, मोहिमा याबद्दल माहिती मिळेल.