जबरदस्त! सर्वात वेगाने चार्ज होणारी कार लाँच, 1 मिनिट चार्जिंमध्ये 32 किमी धावणार


इलेक्ट्रिक स्टार्टअप कंपनी ल्यूसिड मोटर्सने आपल्या बहुप्रतिक्षित ल्यूसिड एअर इलेक्ट्रिक सेडानवरील पडदा हटवला आहे. कंपनीने वेब ब्रॉडकास्टद्वारे आज ल्यूसिड एअरला सादर केले. ही पुर्णपणे इलेक्ट्रिक कार 2021 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ड्यूअल मोटरसह येणारी ही कार 1080 एचपी पर्यंत पॉवर देण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की कार अवघ्या 9.9 सेंकदात एक चतुर्तांश मैल अंतर पार करू शकते. 10 सेंकदांपेक्षा कमी वेळेत हे अंतर पार करणारी ही सध्या एकमेव इलेक्ट्रिक कार आहे.

Image Credited – techcrunch

कंपनीचा दावा आहे की लूसिड एअर अवघ्या 3 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडू शकते. कारची टॉप स्पीड ताशी 320 किमीपेक्षा अधिक आहे. या इलेक्ट्रिक सेडानमध्ये 113 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. यामुळे ही कार सिंगल चार्जमध्ये 832 किमी रेंज देते. कंपनीचा दावा आहे की डीसी फास्ट चार्जिंगचा वापर केल्यास 1 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये कार 32 किमी अंतर पार करू शकते. तर 20 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 482 किमी अंतर सहज पार करण्यास सक्षम आहे.

Image Credited – techcrunch

ल्यूसिड एअरचे डिझाईन देखील खास आहे. याच्या हेडलँम्प्समध्ये मायक्रा लेंस एर्रे सिस्टम देण्यात आलेली आहे. ही टेक्नोलॉजी सर्वात आधुनिक लायटिंग सिस्टम देते. याशिवाय डिजिटली लाईट चॅनेल्स, लाईट डायरेक्शन्स बदलणे देखील शक्य आहे. कारमध्ये फूल साईज लग्झरी-क्लाल इंटेरियर देण्यात आलेले आहे. ड्रायव्हरच्या समोर 34 इंच कर्व्हड ग्लास कॉकपिट 5के डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याशिवाय अनेक खास फीचर्स देखील यात देण्यात आलेले आहेत. कारमध्ये इन-बिल्ट एडवांस्ड अलेक्सा देण्यासाठी कंपनी अ‍ॅमेझॉनसोबत देखील भागीदारी केली आहे.

Image Credited – electrek

टेस्लाचा प्रतिस्पर्धी म्हणून बघितल्या जाणाऱ्या ल्यूसिड मोटर्सच्या या कारची किंमत देखील अधिक आहे. सर्वात स्वस्त असलेले द एअरया व्हेरिएंटची किंमत 80 हजार डॉलर्स (जवळपास 59 लाख रुपये) आहे. तर टॉप व्हेरिएंट असलेल्या एअर ड्रीम एडिशनची किंमत 1,69,000 डॉलर्स (जवळपास 1.25 कोटी रुपये) आहे.