आयपीएलचे नवीन गाणे अडकले वादात, रॅपरने केला चोरीचा आरोप


आयपीएल सुरू होण्याआधीच वादात अडकताना पाहण्यास मिळत आहे. हा वाद आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी लाँच करण्यात आलेल्या अँथममुळे सुरू झाला असून, प्रसिद्ध रॅपर कृष्णाने हे गाणे चोरी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्याचा आरोप आहे की आयपीएलचे अँथम त्याच्या एका रॅपमधून चोरी करण्यात आला. प्रणव अजयराव मालपेने काही वर्षांपुर्वी आलेल्या रॅप साँगला कॉपी केले आहे.

या वर्षीचे आयपीएल अँथम ‘आएंगे हम वापस’ला म्यूझिक डायरेक्टर अजयराव मालपेने तयार केले आहे. कृष्णानुसार, हे गाणे त्याच्या 2017 साली आलेल्या  ‘देख कौन आया वापस’ची कॉपी आहे. कृष्णाने सांगितले की, आयपीएल आणि हॉटस्टार सारख्या मोठ्या कंपन्या मला न विचारता माझ्या गाण्याची कॉपी करत आहे, यामुळे मला खूप निराश वाटले. माझी मॅनेजमेंट टीम आणि लीगल टीम याबाबत कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

मात्र दुसरीकडे प्रणव अजय राव मालपेने हे गाणे ओरिजनल असून, कॉपी केल्याचा दावा केल्याने मला धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, म्यूझिक कंपोझर असोसिएशन ऑफ इंडियाने ही दोन्ही गाणी वेळी असल्याचे म्हटले असून, यावर कृष्णाने देखील असोसिएशनला फटकारले आहे.