हवाई दलाची शान वाढली, अखेर अधिकृतरित्या राफेलचा ताफ्यात समावेश


राफेल लढाऊ विमानांचा आज अखेर अधिकृतरित्या भारती हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे. हरियाणाच्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवरील औपचारिक कार्यक्रमात 5 राफेल विमाने हवाई दलात सामील झाली. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रांसच्या संरक्षणमंत्री फ्लारेंस पार्ले हे उपस्थित होते. राफेल विमानाच्या समावेशामुले हवाई दलाची ताकद आता वाढली आहे.

2016 साली फ्रान्ससोबत झालेल्या 36 राफेल विमानांच्या करारानंतर जुलै महिन्यात 5 विमाने भारतात दाखल झाली होती. राफेल विमानांचा हा ताफा हवाई दलाच्या 17व्या सक्वॉड्रनमध्ये समावेश होणार आहे. या स्क्वॉड्रनला ‘Golden Arrows’ म्हटले जाते.

राफेल भारतासाठी गेमचेंजर ठरेल असेही संरक्षणमंत्री म्हणाले. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेंस पार्ली या खास राफेलच्या इंडक्शनसाठी भारतात आल्या होत्या. औपचारिक कार्यक्रमावेळी सीडीएस बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख आर.के.भदौरिया देखील उपस्थित होते.

राफेलचा ताफ्यात समावेश करण्यापुर्वी पारंपारिक सर्वधर्म पूजा करण्यात आली. यावेळी राफेलला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यानंतर राफेल आणि तेजस विमानांनी उड्डाण घेतले.