मोठा निर्णय, पीएफ खातेधारकांना मिळणार आता 7 लाखांपर्यंतचा अतिरिक्त फायदा


कर्मचारी भविष्य निधी संघटने (ईपीएफओ) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास आता त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मॅक्सिमम इंश्योरेंस रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इश्योरेंस (ईडीएलआय) योजना 1976 अंतर्गत मॅक्सिमम इंश्योरेंस लाभ हा आधी 6 लाख रुपये होता, जो आता 7 लाख रुपये करण्यात आलेला आहे.

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (सीबीटी), ईपीएफच्या बैठकीत झाला. सीबीटीने मॅक्सिम इंश्योरेंस रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.

बोर्डाने इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इश्योरेंस योजना 1976 च्या पॅराग्राफ 22(3) मध्ये दुरुस्ती करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे आता योजनेच्या सदस्यांचा नोकरी दरम्यान कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्यावर निर्भर असलेल्या कुटुंबाला अतिरिक्त मदत मिळेल.

काय आहे इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इश्योरेंस (ईडीएलआय) योजना ?

ईपीएफओ आपल्या ग्राहकांना जीवन विमाची सुविधा देत असते. याचे सर्व सदस्य ईडीएलआय 1976 योजनेंतर्गत कव्हर होतात. ग्राहकाने मृत्यूच्या आधी 12 महिन्यात एका संस्थेत नोकरी केली असल्यास व त्या ग्राहकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास नातेवाईकांना फायदा मिळत असतो. ही मदत एकरकमी मिळत असते. या योजनेत ग्राहकांना पैसे भरावे लागत नाही. कर्मचाऱ्यांसाठी कंपनी पैसे भरत असते.