भायखळा तुरुंगात रियाची पहिली रात्र

अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या रिया चक्रवर्तीची रवानगी मुंबईच्या भायखळा तुरुंगात झाली असून बुधवारची पहिली रात्र रियाने तुरुंगात काढली. सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रियाला सुरवातीला सामान्य बराकीत ठेवले गेले होते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी रात्री क्वारंटाइन बराकीत केली गेली. रियाला जामीन मिळाला नाही तर तिला पर्मनंट बराक दिली जाईल.

या ठिकाणी रियाच्या बराकीशेजारी शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची बराक आहे असे समजते. या विशेष बराकी १० बाय १० किंवा फारतर १५ बाय १५ आकाराच्या आशेत. येथे बाथरूम आहे आणि पाणी पिण्यासाठी मडके किंवा मग दिला जातो. सिलिंग पंखा आहे. गादी, चटई, पांघरूण आणि उशी दिली जाते. येथेही जेल मधलेच जेवण पुरविले जाते मात्र विशेष केस मध्ये घरून जेवण पाठविता येते.

अमली पदार्थ विरोधी पथकाने रियाला ८ सी, २० बी (ii), २७ ए, २८ आणि २९ एनडीपीएस कलमाखाली अटक केली असून त्यातील २७ ए कलम महत्वाचे आहे. यामुळे कदाचित रियाला जामीन मिळू शकणार नाही असे कायदेतज्ञ सांगतात. अमली पदार्थ बाळगणे, विकणे, विकत घेण्यासाठी पैसे पुरविणे या आरोपांसाठी हे कलम लावले जाते आणि त्यानुसार १० वर्षांची शिक्षा होऊ शकते असे समजते.