अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या नोव्हेंबरमध्ये महिन्यात येथे निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पार्टीकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित करण्यात आलेले आहे. ट्रम्प यांच्या प्रचारातील काही व्हिडीओ खास चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये मागील वर्षातील ट्रम्प आणि मोदी यांच्या रॅलीचे दृश्य आहेत. हा व्हिडीओ भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारतही पंतप्रधान मोदींचा जलवा
फोर मोर इयर्स असे शीर्षक असलेला हा व्हिडीओ मागील वर्षी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये ह्यूस्टन येथे पार पडलेल्या मेगा शोपासून सुरू होतो. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. याशिवाय यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाची दृश्य देखील या व्हिडीओत पाहण्यास मिळत आहेत.
या व्हिडीओला मागील वर्षी रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशन दरम्यान जारी करण्यात आले होते. भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून केला जात असून, नागरिकांना हा व्हिडीओ आवडत देखील आहे.