सिल्वर लेकने आता रिलायन्स रिटेलमध्ये केली 7,500 कोटींची गुंतवणूक


अमेरिकेची खाजगी इक्विटी फर्म सिल्वर लेक पार्टनर्सने रिलायन्स समूहाच्या रिलायन्स रिटेल या कंपनीची 1.75 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा करार 7,500 कोटी रुपयांमध्ये झाला. हा गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलची इक्विटी मुल्य 4.21 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी सिल्व्हर लेकने यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

याआधी रिलायन्सने फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि लॉजिस्टिक व्यवसाय 24,713 कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. कच्चे तेल, रिफायनरी आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी रिलायन्सने फ्यूचर ग्रुपचे रिटेल, होलसेल,गोदाम आणि लॉजिस्टिक्स व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. या करारा अंतर्गत फ्यूचर ग्रुपच्या पाच कंपन्या फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (एफईएल) मध्ये अधिग्रहित केल्या जातील.

रिलायन्सने एफईएल (विलीनीकरणानंतर स्थापन होणारी नवीन कंपनी) मध्ये 6.09 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी 1,200 कोटी रुपयांचे प्राधान्य समभाग खरेदी करण्याचा प्रस्तावही दिला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की या करारामुळे रिलायन्स रिटेल लिमिटेडचा बाजारातील प्रसार वाढेल.