पबजी भारतात परतणार ? कंपनीने घेतला मोठा निर्णय


भारत सरकारने काही दिवसांपुर्वीच लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. पबजीची भारतात मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळे पबजीवर बंदी घातल्यानंतर गेमर्स नाराज झाले होते. मात्र आता पबजी फॅन्ससाठी आनंदाची बातमी असून, ही गेम पुन्हा लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे. पबजी कॉर्पोरेशनने चीनच्या टेनसेंट गेम्ससोबत आपले संबंध तोडले आहेत.

पबजी ही मूळ दक्षिण कोरियात डेव्हलप करण्यात आलेली गेम आहे. या गेमच्या मोबाईल व्हर्जनचे हक्क चीनच्या टेनसेंट गेम्सने घेतलेले आहेत. मात्र आता भारतात चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर पबजीचे मुळ कंपनीने भारतातील गेम्सचे ऑपरेशन आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे व भारतात टेनसेंट गेम्सची फ्रेंचाईजी निलंबित केली आहे.

टेनसेंट गेम्ससोबत आपला करार तोडल्यानंतर पबजी भारतात ऑपरेशन्स सुरू करेल. थोडक्यात, पबजीवर चीनी कंपनीची मालकी नसल्यास भारतात या गेमवरील बंदी हटण्याची देखील शक्यता आहे.  सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.