दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन केल्यानंतर आता रिलायन्स जिओ स्मार्टफोन क्षेत्रात देखील दमदार पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ या वर्ष अखेरपर्यंत तब्बल 10 कोटी स्वस्तातले स्मार्टफोन बाजारात आणण्याची शक्यता आहे. अगदी स्वस्तात हे स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असतील व सोबत डेटा ऑफर देखील मिळेल.
जिओ वर्षअखेर 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची शक्यता
अमर उजालाच्या वृत्तानुसार, जिओचा हा 4जी स्मार्टफोन गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे लाँच केला जाईल. मागील महिन्यातच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
जुलै महिन्यात मुकेश अंबानी यांनी माहिती दिली होती की, गुगल एका स्वस्त अँड्राईड व्हर्जनवर काम करत आहे व याच व्हर्जनसोबत कंपनी आपला स्मार्टफोन सादर करेल. हे स्मार्टफोन रिलायन्स डिजाईन करेल. जिओचा हा स्वस्त स्मार्टफोन शाओमी, रियलमी, ओप्पो आणि व्हिवो सारख्या ब्रँड्सला टक्कर देईल.