कोरोनाच्या लढाईत प्लाझ्मा थेरेपीला आशेचे किरण म्हणून पाहण्यात आले होते. मात्र इंडियन काउसिंल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नवीन संशोधनात प्लाझ्मा थेरेपी कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास परिणामकारक नसल्याची माहिती समोर आली आहे. आयसीएमआरने 14 राज्याच्या 39 हॉस्पिटलमधील 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे ट्रायल केले.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरेपी परिमाणकारक नाही – आयसीएमआर
आयसीएमआरला अभ्यासात आढळले की, प्लाझ्मा थेरेपीमुळे मृत्यू रोखता येत नाही व सोबतच प्रकृती गंभीर होत असल्यास ती बिघडण्यापासून रोखण्यास देखील परिणामकारक नाही.
ट्रायलमध्ये इंटरवेंशन आणि कंटोल असे दोन ग्रुप बनविण्यात आले होते. इंटरवेशन ग्रुपमध्ये 235 कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला. तर कंटोल ग्रुपमध्ये 229 लोकांना प्लाझ्मा व्यतिरिक्त नियमित उपचार करण्यात आले. दोन्ही ग्रुप्सवर 28 दिवस लक्ष ठेवण्यात आले. या ट्रायलमध्ये समोर आले की, प्लाझ्मा देण्यात आलेल्या 34 रुग्णांचा म्हणजेच 13.6 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. तर प्लाझ्मा थेरेपी न देण्यात आलेल्या 31 रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही ग्रुपमधील 17-17 रुग्णांची प्रकृती गंभीर झाली.
संशोधनानुसार प्लाझ्मा थेरेपीमुळे श्वास घेण्याची समस्या कमी झाली व थकवा देखील कमी झाला. मात्र यामुळे ताप आणि खोकला या लक्षणांवर काहीच परिणाम जाणवला नाही.