ट्रूकॉलरला टक्कर देण्यासाठी गुगलने आणले भन्नाट फीचर


सध्या प्रामुख्याने फोनमध्ये येणाऱ्या स्पॅम कॉल्सची किंवा अनोळखी नंबरची माहिती जाणून घेण्यासाठी ट्रूकॉलर या अ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र आता ट्रूकॉलरला टक्कर देण्यासाठी सर्च इंजिन गुगलने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर अँड्राईड कॉल्स लाँच केले आहे. कंपनीने भारतासह 5 देशांमध्ये सध्या हे फीचर रोल आउट केले आहे.

गुगलच्या या फीचरमुळे युजर्सला स्पॅक कॉलची माहिती मिळते. हे फीचर्स युजर्सला कोण कॉल करत आहे, कॉल करण्याचे कारण काय आहे आणि कॉलरचा लोगो देखील दिसेल. फ्रॉड कॉलवर लगाम घालण्यासाठी प्रामुख्याने हे फीचर आणण्यात आले आहे.

हे फीचर भारत, स्पेन, ब्राझील, मॅक्सिको आणि अमेरिकेत रोलआउट करण्यात आलेले आहे. याशिवाय बिझनेसचा व्हेरिफाइड बॅच देखील गुगलकडून व्हेरिफाय केलेल्या नंबरवर दिसेल. गुगलचे हे फीचर त्यांना बिझनेस कॉल करण्यामागचे कारण काय आहे, हे देखील सांगेल. ट्रूकॉलरमध्ये अद्याप हे फीचर देण्यात आलेले नाही.

गुगल फोन अ‍ॅपमध्ये हे फीचर आल्याने युजर्सला याचा मोठा फायदा होईल. हे फीचर एकप्रकारे ट्रूकॉलरप्रमाणेच काम करते. त्यामुळे हे फीचर मोबाईलमध्ये आल्यावर थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. अँड्राईड फोनमध्ये गुगल फोन अ‍ॅप डिफॉल्ट डायलरचे काम करत असते. पुढील अपडेटमध्ये हे नवीन फीचर युजर्सला मिळेल.