रियासोबत काम करण्याची या प्रोड्यूसरने व्यक्त केली इच्छा, म्हणाले…


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चर्चेत आहे. ड्रग्स सेवन आणि इतर आरोपांखाली सध्या तिला एनसीबीने अटक केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर रियाविरोधात आरोप केले जात असले तरी अनेकजण असे आहेत ज्या यास्थितीमध्ये देखील तिच्यासोबत आहेत. यातच आता दंबग-3 चित्रपटाचे प्रोड्यूसर निखिल द्विवेदी यांनी रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

निखिल द्विवेदी यांनी रियाबाबत ट्विट केले की, रिया मी तुला ओळखत नाही. मला हे देखील माहित नाही की तू कशाप्रकारची व्यक्ती आहेस. कदाचित जसे दाखवले जात आहे, तशी तू वाईट व्यक्ती असावीस, कदाचित तशी नसावीस देखील. मात्र मला केवळ एवढे माहित आहे की जे होत आहे ते योग्य नाही, बेकायदेशीर आहे व असे सभ्य देशात वागणूक दिली जात नाही.

जेव्हा हे सर्व संपेल तेव्हा आपण सोबत काम करू, अशी इच्छा देखील निखिल द्विवेदी यांनी बोलून दाखवली. निखिल यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

निखिल यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यांनी दबंग-3 सह ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट देखील प्रोड्यूस केलेला आहे.