एलएसीजवळ धारदार शस्त्र घेऊन उभे असलेल्या चीनी सैनिकांचे फोटो आले समोर


गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर सैनिकांकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. लडाखमध्ये पेंगोंग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील भारतीय सैन्य तैनात असलेल्या ठिकाणी जवळ येण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न फसला होता. आता भाले आणि बंदुका असलेल्या चीनी सैनिकांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोवरून लक्षात येते की चीनी सैन्य 15 जून प्रमाणेच संघर्षाच्या तयारीत होते. चीनी सैन्याकडून शस्त्रांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे हे पहिले स्पष्ट पुरावे आहेत.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, सोमवारी भारताच्या नियंत्रणात असलेल्या पर्वतांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य शूटिंग रेंजमध्ये होत्या. मुखपारीजवळ चीनी सैनिक भारतीय पोजिशनच्या जवळ पोहचल्यावर भारतीय सैनिक त्यांच्यावर ओरडले आणि आपले शस्त्र दाखवले. यानंतर चीनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. समोर आलेले फोटो रेंजांगा ला आणि मुखपारी येथील आहेत.

फोटोमध्ये 25-30 चीनी सैनिक चाकू आणि भाल्यासोबत दिसत आहे. त्यांच्याकडे रायफल देखील आहेत. पेंगोंग भागातील उंचीवर ठिकाणांवर भारतीय सैनिकांनी ताबा मिळवल्यानंतर चीनी सैनिक भारतीय पोस्टच्या जवळ येण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत.