अयोध्या विमानतळाला देखील देणार प्रभू श्रीरामांचे नाव


अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. अयोध्येतील रेल्वे स्थानक हे राममंदिरासारखेच असणार आहे. यातच आता अयोध्या विमानतळाला प्रभू श्रीरामाचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय स्तराचे केले जाणार असून, उत्तर प्रदेश सरकारने नाव बदलण्याची आणि विमानतळाची व्याप्ती वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

रिपोर्टनुसार पुढील वर्षी विमानतळ पुर्ण तयार झाले असेल. राममंदिरामुळे अयोध्येत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2017 मध्ये अयोध्या विमानतळ दोन टप्प्यात बनविण्याची योजना होती. याच्या रन-वेची लांबी 2300 मीटर निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळाला बोइंग-777 विमानांसाठी पुरक बनविण्याचे ठरवले.

अयोध्येत तयार होत असलेल्या या विमानतळाला अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला नाही. मात्र विमानतळ आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे तयार केले जात आहे.