चिंता वाढली, साइड इफेक्टमुळे थांबवले ऑक्सफोर्डच्या लसीची ट्रायल


ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकेत रोखण्यात आले आहे. संपुर्ण जगाला या लसीकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. मात्र ट्रायल थांबवल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनमध्ये लस टोचणाऱ्या एका स्वयंसेवकावर याचे साइड इफेक्ट्स दिसून आल्यानंतर अमेरिकेत ट्रायल रोखण्यात आले.

एस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, स्टँडर्ड रिव्ह्यू प्रोसेसने सेफ्टी डेटाच्या तपासणीच्या परवानगीसाठी लसीकरण रोखले आहे. या लसीचे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी ट्रायल सुरू होते. लसीमुळे स्वयंसेवकाची प्रकृती बिघडली असली तरीही बरे होण्याची शक्यता आहे. हे ट्रायल रोखल्याने एस्ट्राजेनेकाच्या इतर ट्रायल्सवर देखील याचा परिणाम झाला आहे.

एस्ट्राजेनेकाने सांगितले की, ही एक नियमित प्रक्रिया आहे. जे कोणत्याही ट्रायलमध्ये अस्पष्ट आजाराची तपासणी करता असे होते. आम्ही हे सुनिश्चित करतो की ट्रायल पुर्ण प्रामाणिकपणे पार पडावे. प्रवक्त्यांनी सांगितले की, पुनरावलोकनास गती देण्यासाठी आणि चाचणीच्या टाईमलाईनवरील संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी कार्य केले जात आहे.

क्लिनिकल ट्रायल रोखण्याची ही प्रक्रिया सामान्य नसून, कंपनी हे ट्रायल किती दिवस रोखणार आहे याची देखील अद्याप माहिती नाही. दरम्यान, सध्या जगभरातील 9 लसींचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.