सिंगापूर येथे अॅपलचे पाहिले तरंगते स्टोर

फोटो सौजन्य झी न्यूज

जगातील पहिले तरंगते टेक स्टोर आयफोन निर्माती अॅपल कंपनी सिंगापूर मध्ये सुरु करत असून या स्टोर्सचे १० सप्टेंबरला गुरुवारी उद्घाटन केले जात आहे. सिंगापूरच्या जगप्रसिध्द मरीना बे या आयकॉनिक स्थळी अॅपलचे हे स्टोर मरीना बे स्टँड नावाने सुरु होत असून गुरुवार पासून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले जात आहे.

हे स्टोर घुमटाच्या आकाराचे असून ते पाण्यावर तरंगते आहे. अॅपलप्रेमी ग्राहकांसाठी या स्टोर्स मधून खरेदी हा अनोखा अनुभव असेल असा दावा कंपनीने केला असून हे स्टोर्स पूर्णपणे काचेचे आहे. रोमच्या पँथीऑनवरून या स्टोर्सच्या डिझाईनची प्रेरणा घेतली गेली आहे. या स्टोर्स मध्ये १५० कर्मचारी काम करतील. जगभरातल्या २३ भाषा मध्ये या स्टोर्स मधील कर्मचारी ग्राहकंशी संवाद साधू शकतील. या स्टोर्स मध्ये अॅपलची सर्व उत्पादने मिळणार असून पर्सनल टेक्निकल सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे असे समजते.