रिलायंस रिटेल वेंचर्स मध्ये गुंतवणुकीस अमेरिकन कंपन्या उत्सुक

रिलायंस जिओ मध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेल्या अमेरिकन कंपन्या आता रिलायंस रिटेल वेंचर लिमिटेड (आरआरव्हीएल) मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे समजते. मिडिया रिपोर्ट नुसार फ्युचर ग्रुपची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा या कंपन्या करत आहेत. त्यानंतर फेसबुक, अमेरिकन इक्विटी फर्म केकेआर, अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेक आरआरव्हीएल मध्ये हिस्सा घेण्याच्या तयारीत आहेत. पैकी सिल्व्हर लेकने १ अब्ज डॉलर्स म्हणजे ७५०० कोटी रुपये गुंतवणूकीबाबत रिलायंसशी चर्चा सुरु केली आहे असे फायनाशियल टाईम्सचे वृत्त आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायंस रिटेल व्हेंचर लिमिटेड, फ्युचर ग्रुप अँड होलसेल बिझिनेस व लॉजिस्टिक अँड वेअरहौसिंगचे अधिग्रहण करत असून त्यामुळे बिग बझार, इझीडे, एफबीबीची ४२० शहरातील १८०० स्टोर्स रिलायंसच्या ताब्यात येणार आहेत. हे अधिग्रहण करण्यासाठी रिलायंसने २४७१३ कोटी रुपये मोजण्याची तयारी केली आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायंस रिटेल मधील १० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला असून ही विक्री नवीन शेअर स्वरुपात केली जाणार असल्याचे समजते.