चीनने कोरोनाची ऐतिहासिक लढाई जिंकली – शी जिनपिंग


जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनच्या वुहान शहरातून झाल्याचे सांगितले जाते. चीन व्हायरस नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरल्याने जगभरात याचा संसर्ग झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. मात्र आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी हे आरोप फेटाळले आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करताना चीनने एक अविश्वसनीय आणि ऐतिहासिक संकटावर मात केली असल्याचे ते म्हणाले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिनपिंग म्हणाले की, आपण अविश्वसनीय आणि ऐतिहासिक अशा संकाटवर मात करण्यास यश मिळवले आहे. सोबतच त्यांनी या आजाराविरुद्धच्या लढ्यातील नागरिकांच्या संघर्षाचे देखील कौतुक केले. ते म्हणाले की, आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खूप लवकर यश मिळवले. आपण अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यात आणि कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यात जगात सर्वात पुढे आहोत.

दरम्यान, शी जिनपिंग यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 83 वर्षीय प्रसिद्ध आरोग्य तज्ञ झांग नंनशन यांचा देखील सन्मान करण्यात आला.