शिवसेना आयटी सेलकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने वादात अडकलेल्या अभिनेत्री कंगनाविरोधात शिवसेनेच्या आयटी सेलकडून आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. शिवसेनेच्या आयटी सेलकडून ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरोधात तक्रार दाखल केली असून, तिच्याविरोधात देशद्राहाची तक्रार नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. तसेच मुंबई पोलिसांची आपल्याला भिती वाटत असल्याचे म्हटले होते. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि तिच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आपण 9 तारखेला मुंबई येणार असून, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवावे, असे खुले आव्हान देखील कंगनाने दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर कंगना मुंबईला पोहचण्याआधीच बीएमसीने तिच्या मुंबईतील ऑफिसवर पोहचली होती. याशिवाय कंगना मुंबईला आल्यावर तिला नियमांनुसार क्वारंटाईन केले जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.