काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सरकारी कंपनी विका मोहिम चालवत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
मोदी ‘सरकारी कंपनी विका’ मोहिम चालवत आहेत, राहुल गांधींचा घणाघात
राहुल गांधींनी वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण शेअर केले आहे. यात सरकार एलआयसीमधील 25 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे म्हटले आहे.
मोदी जी ‘सरकारी कंपनी बेचो' मुहीम चला रहे हैं।
खुद की बनायी आर्थिक बेहाली की भरपाई के लिए देश की सम्पत्ति को थोड़ा-थोड़ा करके बेचा जा रहा है।
जनता के भविष्य और भरोसे को ताक पे रखकर LIC को बेचना मोदी सरकार का एक और शर्मनाक प्रयास है। pic.twitter.com/W4OjDJ1nY7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2020
यावरून निशाणा साधत राहुल गांधींनी टीका केली की, मोदीजी सरकारी कंपनी विका मोहिम चालवत आहेत. स्वतःमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची भरपाई करण्यासाठी देशाच्या संपतीला थोडेथोडे करून विकले जात आहे. जनतेच्या भविष्य आणि विश्वासाला असे बाजूला ठेवून एलआयसी विकण्याचा मोदी सरकारचा आणखी एक लाजीरवाणा प्रयत्न आहे.
याआधी राहुल गांधी यांनी आज देश मोदी सरकार निर्मिती अनेक आपत्तींचा सामना करत आहे, त्यातीलच एक खाजगीकरण असल्याचे म्हणत टीका केली होती.