अखेर रिया चक्रवर्तीला अटक: नार्कोटीक्स विभागाची कारवाई
मुंबई/ प्रतिनिधी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अंमलीपदार्थ सेवनाबद्दलच्या संशयातून सलग ३ दिवस चौकशी केल्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकाने रिया चारावर्तीला अटक केली आहे. तिचा भाऊ शौविक याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना त्यामध्ये अंमली पदार्थांशी संबंधित बाबी आढळून आल्या. त्यानंतर आर्थिक बाबींबरोबरच अंमली पदार्थांबाबतच्या संशयाची सुई तिच्याकडे वळली. सीबीआयबरोबरच एनसीबीने केलेल्या तपासात तिच्या व्हॉट्सऍप संभाषणात तिने अंमली पदार्थ खरेदीसंबधी केलेले संवाद उघडकीला आले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने बॉलिवूडमधील अनेक सिताऱ्यांचे अमली पदार्थ कनेक्शन उघड केल्याचे सांगितले जात आहे. तिच्या अटकेनंतर या कनेक्शनबद्दलच्या तपासाला अधिक गती येण्याची शक्यता आहे.