आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आज आपल्या रिब्रँडिंगची घोषणा केली आहे. आता या कंपन्या व्ही (Vi) या नावाने ओळखल्या जातील. या कंपनीचे मालकी हक्क ब्रिटनच्या व्होडाफोन आणि आदित्य बिरला ग्रुप आहे. काही वर्षांपुर्वी व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांनी विलिनिकरण केले होते. तेव्हापासून कंपन्या त्याच नावाने ओळखल्या जात होत्या.
आता ‘या’ नावाने ओळखले जाणार व्होडाफोन-आयडिया
कंपनी आज नवीन नाव आणि ब्रँड सादर केला आहे. दोन्ही कंपन्या आता एका ब्रँड खाली काम करतील. कंपनी म्हटले आहे की 4जी सह कंपनीकडे 5जी टेक्नोलॉजी देखील तयार आहे. कंपनीचा दावा आहे की विलिनिकरणानंतर देशभरातील 4जी कव्हरेज दुप्पट झाले आहे.
कंपनीचे सीईओ रविंद्र टक्कर म्हणाले की, व्होडाफोन-आयडियाचे विलिनिकरण दोन वर्षांपुर्वी झाले होते. आम्ही तेव्हापासून दोन मोठ्या नेटवर्कच्या एकीकरणाच्या दिशेने काम करत होतो. आज व्हीआय ब्रँड सादर करताना आनंद होत आहे.
कंपनीने यावेळी कोणत्याही नवीन प्लॅन्सची घोषणा केलेली नाही. मात्र टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याचे संकेत दिले आहेत.