सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता रिया चक्रवर्तीच्या टीमने सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन देण्याच्या आरोपाखाली रियाने ही तक्रार दाखल केली आहे. सध्या रियाच्या ड्रग्स प्रकरणात एनसीबी चौकशी करत आहे.
रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात दाखल केली तक्रार
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार रियाने आपल्या तक्रारीत पहिल्यांदाच सुशांतची बहिण प्रियंकावर ड्रग्स देण्याचा आरोप केला आहे. रियाने तक्रारीत बनावट प्रस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉक्टरला देखील जबाबदार धरले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टर कुमारने प्रियंकाच्या सांगण्यावरून सुशांतची तपासणी न करताच डिप्रेशनचे औषध दिले होते. जे कायद्याचे उल्लंघन आहे. डिस्क्रिप्शन दिल्लीच्या ओपीडीची आहे, तर सुशांत त्यावेळी मुंबईत होता.
तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टर तरूण कुमार हे एक कार्डियॉलजिस्ट आहेत. मात्र तरीही त्यांनी मानसिक रोगाशी संबंधित डिप्रेशनचे औषधांची बनावट प्रिस्क्रिप्शन दिली. रियाने मुंबईत दाखल केलेल्या या तक्रारीमुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.