रेल्वेने अनेक जुने कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. रेल्वेने कॅबिनेटला जो प्रस्ताव पाठवला आहे त्यात भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या दोन कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावानुसार आयआरए सेक्शन 144 (2) मध्ये संशोधन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
आता रेल्वेत भीक मागणे आणि सिगरेट ओढल्यास होणार नाही जेल?
न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, कायद्यातील सेक्शन 167 मध्ये देखील दुरुस्ती करण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. ही दुरुस्ती मंजूर झाल्यास रेल्वे अथवा स्टेशनवर बीडी, सिगरेट ओढणाऱ्या जेलमध्ये न पाठवता, त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय रेल्वे स्टेशनवर भीक मागणे देखील गुन्हा आहे. यात देखील बदल होण्याची शक्यता आहे.
सुत्रांनुसार, केंद्र सरकार अशा कायद्यांमध्ये बदल किंवा संपुष्टात आणण्याचा विचार करत आहे, ज्याचा उपयोग राहिलेला नाही. अशा कायद्यांची विविध मंत्रालयांकडून यादी मागवली जात आहे.