खुशखबर! रशियात याच आठवड्यात नागरिकांसाठी उपलब्ध होणार कोरोना लस

जगातील अनेक देशांमध्यो कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. मागील महिन्यात रशियाने आपल्या स्पुटनिक-व्ही या लसीला अधिकृतरित्या मान्यता देत सर्वांना धक्का दिला होता. आता रशियात याच आठवड्यात ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या आठवड्यापासून कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली जाईल. रशियन न्यूज एजेंसी TASS रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे उपसंचालक डेनिस लोगुनोव्ह यांचा उल्लेख करत माहिती दिली की, स्पुटनिक व्ही लसीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्यापक उपयोगासाठी जारी केले जात आहे. आरोग्य मंत्रालय लसीचे टेस्टिंग सुरू करणार आहे. आम्हाला लवकरच याची परवानगी मिळेल.

सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या उपयोगासाठी लसीच्या बॅचला परवानगी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल.

दरम्यान, रशियाच्या या लसीला गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत मिळून बनवले असून, पहिल्या दोन टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाले आहे.