चीनने जगासमोर सादर केली आपली पहिली कोरोना लस


चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या आजारावरील लस शोधण्याचे काम जगभरात सुरू आहे. चीनमध्ये देखील काही लसी अंतिम टप्प्यात असून, आता चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक आणि सिनोफॉर्म कंपनीने तयार केलेली लस पहिल्यांदाच जगासमोर सादर केली आहे. सध्या या लसीला बाजारात आणण्यात आलेले नाही. मात्र कंपनीला विश्वास आहे की तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुर्ण झाल्यानंतर या वर्षाअखेर बाजारात लस उपलब्ध होईल.

Image Credited – asianage

सिनोव्हॅकच्या प्रतिनिधींनी सांगितले की, कंपनीने आधीच लसीच्या उत्पादनासाठी फॅक्ट्री बनविण्याची तयारी केली आहे. या फॅक्ट्रीत दरवर्षी 300 मिलियन डोस तयार होतील. या लसीचे ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी लोकांनी याविषयी माहिती जाणून घेतली.

सिनोफॉर्मने सांगितले की, या लसीमुळे  1 ते 3 वर्ष अँटीबॉडीज राहतात. मात्र अंतिम परिणाम केवळ चाचणीनंतर समोर येतील. रिपोर्टनुसार दोन डोसची किंमत 1000 युआन (जवळपास 11 हजार रुपये) असण्याची शक्यता आहे.