केंद्रीय गृहमंत्रालय कंगनाला देणार ‘वाय’ दर्जाची सुरक्षा


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगनावर टीकेची झोड उठली आहे. कंगनाला मुंबईत न येण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावर कंगनाने आपण 9 तारखेला मुंबई येणार असून, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आपल्याला रोखून दाखवावे, असे खुले आव्हान दिले होते.

याआधी कंगनाच्या वडिलांच्या मागणीनंतर हिमाचल प्रदेश सरकारने देखील कंगनाला सुरक्षा पुरवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्रालय कंगनाला सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कंगनाने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

अमित शाहांचे आभार मानत कंगनाने लिहिले की, हा पुरावा आहे की कोणत्याही देशभक्तचा आवाज फासिस्ट चिरडू शकत नाहीत. मी अमित शाहजीं ची आभारी आहे. परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबई जाण्याचा सल्ला देऊ शकले असते, मात्र त्यांनी भारताच्या एका मुलीच्या वचनाचा मान ठेवला. माझ्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा लाज राखली. जय हिंद!

दरम्यान, याआधी कंगनाने आपल्या मुंबई पोलिसांची भीती वाटते, त्यामुळे केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश सरकारने द्यावी असे म्हटले होते.