बाबो! विक्रमासाठी तब्बल अडीच तास बर्फात बसून होती ही व्यक्ती


बर्फात तुम्ही 1-2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हात ठेवू शकत नाही. फ्रिजमध्ये देखील जास्त वेळ हात ठेवणे शक्य नाही. काही मिनिटातच हा सुन्न पडतो. मात्र एका पठ्ठ्याने असा विक्रम केला आहे, जो समजल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने सर्वाधिक वेळ बर्फात बसण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जोसेफ कोईबेर्ल नावाचा हा व्यक्ती विक्रमसाठी तब्बल अडीच तास बर्फात बसून होता. या नवीन विक्रमासह त्याने आपला आधीचा विक्रम मोडला आहे. एका काचेच्या बॉक्समध्ये जवळपास 200 किलो बर्फ होता. यात जोसेफ केवळ स्विम ट्रंक खालून उभा राहिला.

थरकाप उडवणारा हा विक्रम केल्यानंतर जोसेफने सांगितले की, यावेळी तो केवळ सकारात्मक विचार देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत होता. याचमुळे जुना विक्रम मोडू शकलो. वर्ष 2019 मध्ये जोसेफने 30 मिनिटे बर्फात घालवले होते.

या विक्रमासह जोसेफ म्हणाला की, पुढच्या वेळेस लॉस एंजेलिसमध्ये हा विक्रम देखील मोडीत काढणार आहे.