इलेक्ट्रिक कार्सला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न, 69 हजार पेट्रोल पंप्सवर मिळणार चार्जिंग सुविधा


केंद्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार देशभरात जवळपास 69 हजार पेट्रोल पंप्सवर कमीत कमी एक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग किऑक्स लावण्याचा विचार करत आहे. या पावलामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची आशा आहे. याशिवाय सकराक कंपनीच्या मालकीचे, कंपनीद्वारे संचालित केले जाणाऱ्या (सीओसीओ) आणि सरकारी रिफाइनरी कंपन्यांना पेट्रोल पंपावर ईव्ही वाहनांसाठी चार्जिंग किऑक्स लावणे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग ढाच्याबाबत आढावा बैठकीत ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना सूचना दिली की, प्रशासकीय नियंत्रणाखालील पेट्रोलियम विपणन कंपन्या सर्व सीओसीओ पेट्रोल पंपांवर चार्जिंग किऑक्स लावण्याचे आदेश जारी करू शकतात. अन्य फ्रेंचाइजी पेट्रोल पंप चालकांना देखील कमीत कमी चार्जिंग किऑस्क लावण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

या निर्णयामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरील निर्भरता कमी होईल प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास सर्वात मोठी समस्या चार्जिंग स्टेशन आहे. देशभरात चार्जिंग स्टेशन असल्यास मागणी देखील वाढेल.