10 सप्टेंबरला लाँच होणार ही दमदार बाईक, किंमत 4 सेंट्रो एवढी

ट्रायम्फ मोटारसायकल भारतात एक दमदार बाईक लाँच करणार असून, या बाईकची किंमत वाचल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. या बाईकची किंमत एखाद्या लग्झरी कारपेक्षा जास्त आहे. या बाईकच्या किंमतीत तुम्ही 4 ह्युंडाई सेंट्रो खरेदी करू शकता.

Image Credited – Aajtak

ट्रायम्फ मोटारसायकल भारतात 10 सप्टेंबरला ट्रायम्फ रॉकेट 3जीटी बाईक लाँच करणार आहे. कंपनीची ही भारतातील सर्वात महागडी बाईक असेल. कंपनीने या शानदार बाईकच्या लाँचिंगबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्रायम्फ रॉकेट 3जीटीमध्ये 2,458सीसी चे ट्रिपल सिलेंडर इंजिन दिले जाईल. हे इंजिन 167पीएस पॉवर आणि 221 एनएम टॉर्क जनरेट करेल.

Image Credited – Droom

ट्रायम्फच्या या नवीन बाईकमध्ये एडजस्टेबल स्वेप्ट-बँक हँडल आणि फॉरवर्ड सेट फुटपेग देण्यात येईल. यात आरामदायी सीट आणि विंडस्क्रीनसह एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी सुविधा देखील मिळेल. सेफ्टीसाठी यात Brembo M4.30 स्टाइल 4-पिस्टन रेडियल कॅलिपर दिले आहे. या नवीन बाईकमध्ये 4 राइडिंग मोड आणि क्रूज कंट्रोल पर्याय देखील मिळेल.

किंमतीबद्दल सांगायचे तर भारतीय बाजारात रॉकेट 3आर आधीपासूनच उपलब्ध आहे. या बाईकची किंमत 18 लाख रुपये आहे. त्यामुळे या नवीन बाईकची किंमत 20 लाखांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.