100 वर्षात तिसऱ्यांदा दिसला ब्लू व्हेल, वजन 1 लाख किलोंपेक्षा अधिक!

जगातील सर्वात मोठा जलचर प्राणी असलेला ब्लू व्हेल मासा खूप कमी वेळा पाहण्यास मिळतो. जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधक ब्लू व्हेलवर संशोधन करत असतात. या भल्यामोठ्या माशाचा शोध घेण्यासाठी खोल समुद्रात देखील जातात. मात्र खूप कमी जणांना हा मासा दिसतो. अशाच एका ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील फोटोग्राफरला ब्लू व्हेलचा फोटो कॅमेऱ्याद कैद करण्याची संधी मिळाली.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या या ब्लू व्हेल माशाची लांबी 42 फूट आणि वजन अंदाजे 1 लाख किलो असल्याचे सांगितले जात आहे. ब्लू व्हेल मासा कॅमेऱ्यात कैद होणे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र सिडनीच्या तटावर एवढा मोठा मासा दिसणे हे 100 वर्षात केवळ तिसऱ्यांदाच घडले असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो सियान नावाच्या फोटोग्राफरने कैद केला आहे.

सियानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, मी कुठून सुरू करू. मी निशब्द आहे. माझ्या डोक्यात लाखो गोष्टी फिरत आहेत. हा मासा 30 मीटर लांब असू शकतो. याच्या जीभेचे वजन एका हत्ती एवढे असेल आणि ह्रदया कार एवढे मोठे असेल.

या फोटोबाबत ऑस्ट्रेलियाच्या एनएसडब्ल्यू नॅशनल पार्क अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने सांगितले की, याचे वजन 100 टन असू शकते.