मी कंगनाची माफी मागण्यास तयार, पण… – संजय राऊत

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने अभिनेत्री कंगना राणावत वादात अडकली आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेनेकडून तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. कंगना आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या वाकयुद्धच रंगले आहे. चिडलेल्या संजय राऊत यांनी कंगनाचा ‘हरामखोर’ असा उल्लेख केल्यानंतर आता हे प्रकरणच चांगलेच तापले आहे.

संजय राऊत यांनी हरामखोर असा उल्लेख केल्यानंतर कंगनाने ट्विट केले होते की, वर्ष 2008 मध्ये मूव्ही माफियांनी मला वेडी घोषित केले होते. 2016 मध्ये चुडैल म्हटले आणि आता 2020 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्याने हरामखोर मुलीचा खिताब दिला आहे. या सर्वांनी माझ्यासोबत हे यामुळे केले की मी सुशांतच्या हत्येनंतर मुंबईत असुरक्षित वाटते असे म्हटले.

यानंतर आता हरामखोर विधानावरून कंगनाची माफी मागणार का ? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, जर त्या मुलीने (कंगना) महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी देखील माफी मागण्याचा विचार करेल. तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटले. हेच अहमदाबादला म्हणण्याची तिची हिंमत आहे का ?

दरम्यान, दुसरीकडे कथितरित्या कंगनाला धमकवण्याच्या आरोपाखाली शिवसेना आमदार प्रदीप सरनाईक यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे.