राजनाथ सिंह यांनी घेतली इराणच्या संरक्षण मंत्र्यांची भेट, या मुद्यांवर झाली चर्चा

रशियाच्या दौऱ्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे थेट इराणच्या दौऱ्यावर गेले होते. इराणच्या दौऱ्यावर राजनाथ सिंह यांनी तेथील संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल आमिर हतामी यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंध वाढवण्यासोबतच अफगाणिस्तान, चीनसह अनेक क्षेत्रीय मुद्यांवर चर्चा झाली.

इराणच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, दोन्ही रक्षामंत्र्यांनी द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याविषयी चर्चा केली आणि अफगाणिस्तानमध्ये शांती, स्थिरतासह क्षेत्रीय मुद्यांवर चर्चा झाली.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, राजनाथ सिंह म्हणाले की, भारत अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थितीबाबत चिंतित असून, शांततेसाठी स्थानिक सरकारच्या प्रयत्नांचे समर्थन करत राहील. पर्शियन आखातामध्ये इराण, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातशी संबंधित घटनांमुळे तणाव वाढला आहे. या भागातील तणावाच्या स्थिविषयी देखील भारताने चिंता व्यक्त केली.