रेल्वे करणार 1.40 लाख पदांसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा आयोजित

रेल्वे 15 सप्टेंबरपासून 1.40 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी दिली आहे. यादव यांनी सांगितले की 15 सप्टेंबपासून कॉम्प्युटर आधारित परीक्षेचा पहिला टप्पा आयोजित केला जाईल.

ही परीक्षा 3 श्रेणींच्या जवळपास 1.40 लाख पदे भरण्यासाठी आयोजित केली जाईल. पदे तीन प्रकारची असून, यात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (गार्ड, क्लार्क इ.), स्वतंत्र आणि मंत्रीस्तरीय व लेव्हल 1 (ट्रॅक मॅनेजर, पॉइंट्समन इ.) ही पदे असतील. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत याबाबत पुष्टी केली आहे.

यादव म्हणाले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे परीक्षा आयोजित करता आल्या नाहीत. आम्ही 1,40,640 पदांसाठी विविध श्रेणींमधील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. कोरोना महामारीच्या आधी याबाबत सुचित करण्यात आले होते. मात्र कोव्हिड महामारीमुळे कॉम्प्युटर आधारित परीक्षा पुर्ण झाली नाही.

रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे भरती बोर्ड सर्व अधिसूचित रिक्त जागांसाठी कॉम्प्युटर-आधारित परीक्षा आयोजित करण्यास वचनबद्ध आहे आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत आहे.