मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशांची बचत करत आहात ? या योजनेत करा गुंतवणूक

मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने पालक बचत करण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून, मुलांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलांचे भविष्य सुकर करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलांसाठी मोठी बचत करू शकता. या योजनेत तुम्ही छोटी-छोटी गुंतवणूक करून रक्कम तैयार करू शकता.

मिळत आहे 5.8 टक्के व्याज –

 रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेत तुम्हाला एफडी पेक्षा अधिक चांगले व्याज मिळते व पैसा सुरक्षित देखील राहतो.

महिन्याला कर 5 हजार रुपयांची गुंतवणूक –

या योजनेत तुम्ही महिन्याला 5 हजार रुपये गुंतवणूक करत असाल, तर यावर तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळते. याचाच अर्थ 10 वर्षाने कालावधी पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला 8,14,481 रुपये मिळतात. यात 2,14,481 रुपये व्याज मिळेल.

कोण उघडू शकते खाते ?

लहान मुलांच्या नावाने या योजनेत खाते उघडता येते. 10 वर्षांचे झाल्यानंतर ते स्वतः ऑपरेट करू शकतात. 3 जणांचे ज्वाइंट अकाउंट देखील उघडता येते. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपये आणि कमाल कितीही रक्कम गुंतवू शकता. योजनेचा 5 वर्षांचा लॉकइन कालावधी आहे. यानंतर तुम्ही 5 वर्षांसाठी कालावधी वाढवू देखील शकता.