केवळ ट्रम्प रोखू शकतात पुढील 9/11 हल्ला, लादेनच्या पुतणीचा दावा

अमेरिकेत राष्ट्रपतीसाठी होणाऱ्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप, नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. यातच आता दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाचीने मोठे वक्तव्य केले आहे. लादेनचा मोठा भाऊ यसलामची मुलगी नूर बिन लादेनने दावा केला आहे की केवळ डोनाल्ड ट्रम्पच अमेरिकेला पुढील 9/11 हल्ल्यापासून रोखू शकतात.

नूर आपल्या दोन बहिणींसह स्विर्झलँडमध्ये राहते. हे कुटुंब लादेनपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी स्वतःचे आडनाव लादिन असे सांगते. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत नूर म्हणाली की, आयएसआयएसने ओबाना आणि बाइडन यांच्या कार्यकाळात प्रसार केला आणि यूरोपर्यंत आले. ट्रम्प यांनी दाखवले की ते अमेरिका आणि आम्हाला परदेशी धोक्यापासून वाचवू शकतात. ते दहशतवाद्यांना हल्ल्याची संधी मिळण्याआधीच संपवू शकतात.

नूर बिन लादेन म्हणाली की, मी भलेही स्विर्झलँडमध्ये राहत असेल, मात्र मनाने अमेरिकन समजते. 2015 पासूनच मी ट्रम्प यांची समर्थक आहे. मी त्यांच्या संकल्पांचे कौतुक करते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून यावे. हे केवळ अमेरिकाच नाही तर पश्चिमी सभ्यतेसाठी महत्त्वाचे आहे.

Loading RSS Feed