उद्धव ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, दुबईवरुन फोन आल्याचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्तान असलेल्या मातोश्रीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय फोन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन दुबईवरून आला होता.

जनसत्ताच्या वृत्तानुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊच्या गँगचा हस्तक असल्याचे सांगत घराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोननंतर मातोश्री बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फोन ज्या नंबरवरून आला होता, त्याचा तपास केला जात आहे.

क्राइम ब्रांचने सांगितले की, शनिवारी रात्री 2 वाजता दुबईवरून मातोश्रीवर फोन आला होता. फोन करणाऱ्यांना दाऊद भाईंना मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलायचे आहे, असे सांगितले. फोन मुख्यमंत्र्यांना ट्रांसफर करण्यास देखील सांगितला, मात्र ऑपरेटरने नकार दिला. सध्या या निनावी प्रकरणाचा तपास केला जात आहे.