युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल, चीनची पोकळ धमकी

सीमेवरील तणावाच्या स्थिती चीन दुहेरी चाल चालताना दिसत असून, एकीकडे चीन सरकार शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचे दर्शवत आहे. तर दुसरीकडे तेथील सरकारी मीडिया युद्धाबाबत भडकाऊ भाष्य करत आहे. चीनचा सरकार मीडिया असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला धमकी देत, युद्ध झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नसले असे म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमध्ये म्हटले की, आम्ही भारताला लक्षात आणून देऊ इच्छितो की चीनची राष्ट्रीय ताकद, ज्यात सैन्याचा देखील समावेश आहे, ती भारताच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. चीन आणि भारत दोन्ही महान शक्तीशाली देश आहेत. मात्र युद्ध क्षमतेचा मुद्दा येतो, तेव्हा भारताचा पराभव होईल. सीमायुद्ध सुरू झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नसेल, अशी पोकळ धमकी चीनने दिली आहे.

आम्हाला आशा आहे संरक्षण मंत्र्यांची बैठक दोन्ही देशांसाठी महत्त्वपुर्ण मोड असेल. प्रत्येक पक्ष सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी योग्य तो प्रयत्न करेल, अशी दुहेरी भूमिका देखील चीनच्या सरकारी मीडियाने मांडली आहे.

ग्लोबल टाईम्सने चीनच्या विरोधातील भारतच्या कारवाईला राष्ट्रवाद जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय नागरिक व्यापक स्वरूपात सीमेच्या मुद्यावर सहभागी आहेत. भारतीय सैनिकांचे स्पष्टरित्या स्थानिक राष्ट्रवादाद्वारे अपहरण करण्यात आले आहे.